सोलापूर(करमाळा) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या अनेकांना काळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत माणसावर जीवन अवलंबून असणाऱ्या मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा प्राण्यांसाठी 'आम्ही करमाळाकर' या संस्थेच्यावतीने चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
करमाळ्यात भटक्या प्राण्यासांठी करण्यात आली चाऱ्याची सोय
'आम्ही करमाळाकर' या संस्थेच्यावतीने भटक्या प्राण्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत माणसावर जीवन अवलंबून असणाऱ्या मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
संस्थेच्यावतीने करमाळा शहरातील भटक्या गायींना हिरवा चारा आणि श्वांनाना पाव देण्यात आले आहे. मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. परंतु मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. त्यांची उपासमार होऊ नये यासाठी हा उपक्रम आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी विमा प्रतिनिधी चेतन किंगर, संगम हॉटेलचे मालक संदीप चुंग, पत्रकार दिनेश मडके, सुरेश बदलाणी, झनकसिंह परदेशी, मुन्नाशेठ हसिजा, ऋषीकेश परदेशी, दिनेश माळवे हे कार्यरत आहेत.
या उपक्रमाला करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, मुख्याधिकारी विणा पवार यांनी पाठिंबा दिला. या उपक्रमाला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण प्राण्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.