महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रंगी रंगला श्रीरंग - मोहिनी भागवत एकादशी निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फुलांची आरास

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज रविवारी मोहिनी भागवत एकादशी निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरात व मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर वारकरी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फुलांची आरास
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फुलांची आरास

By

Published : May 23, 2021, 10:17 AM IST

Updated : Sep 11, 2021, 6:56 PM IST

पंढरपूर- विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज रविवारी मोहिनी भागवत एकादशी निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरात व मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचा गाभारा मनमोहक दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा अधिक वापर करून सजावट करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर वारकरी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

मोहिनी भागवत एकादशी निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फुलांची आरास

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात तीनशे टन फुलांची आरास

भागवत एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिरातील आरास विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकर पाचुंदकर पाटील यांनी केली आहे. मंदिरातील गाभारा व चौखांबी फुलांच्या रंगीसंगतीत सजला आहे. यामध्ये झेंडू, मोगरा, अष्टर, गुलाब फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर एकून तीनशे टन फुल वापरून आकर्षक अशी फुलांची आरास तयार करण्यात आली आहे. या सजावटीला सुमारे 80 हजार रुपये खर्च आल्याचे सांगण्यात आले आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फुलांची आरास

विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांविना सुनेसुने

सद्या कोरोनामुळे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या फुलांची आरास व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेत स्थळ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना दर्शन घेता येत आहे.

Last Updated : Sep 11, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details