पंढरपूर - उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला असून अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीने रौद्र रुप धारण केले आहे. चंद्रभागा नदी पात्रात सुमारे 1 लाख 80 हजार क्युसेक पाणी आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीतील पाणी पात्र सोडून शहरातील विविध भागात शिरले आहे. पूरपरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीकाठच्या जवळपास ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
चंद्रभागा नदीला महापूर, पंढरपुरच्या सखल भागात पाणी शिरले - पंढरपुरात चंद्रभागा धोक्याच्या पातळीत
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. तसेच पुणे,सातारा जिल्ह्यातही झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी चंद्रभागा नदीला पूर आला आहे. चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. तसेच पुणे,सातारा जिल्ह्यातही झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी चंद्रभागा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
शहरातील व्यास नारायण, अंबाबाई पटांगण, लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकाळी अजून ३०० असे एकूण ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.