सोलापूर - जिल्ह्यात भीमा नदीला आलेला पूर काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीत होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण जिल्हा कोरडा असला, तरी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे. नदीला आलेल्या पुरामूळे नदी काठच्या 94 गावांना पूराचा फटका बसला आहे. दरम्यान, आता पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाणी कमी झाल्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली असून पंढरपूरची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू होणार आहे.