महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर पूरमय;  सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी लोकांची धावपळ सुरू - वीर आणि उजनी धरणातून सोडले पाणी

वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे.पाणी शहरात शिरल्यामुळे सुस्ते येथील जवळपास अडीचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पंढरपुर पुरमय

By

Published : Aug 7, 2019, 10:03 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. दरम्यान, नागरिकांची सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ सुरु आहे.

पंढरपुर पुरमय
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे पंढरपूर- तिर्हे मार्गे सोलापूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. देगांव आणि सुस्ते येथे नदीचे पाणी रस्त्यांवर आले आहे. यामुळे पंढरपूरला जाण्यासाठी मगरवाडी हा एकमेव मार्ग शिल्लक राहीला आहे.पाणी शहरात शिरल्यामुळे सुस्ते येथील जवळपास अडीचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांची उंच ठिकाणी पोहचण्यासाठी धावपळ सुरु आहे. तसेच पंढरपुरात सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details