महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी, पक्ष्यांच्या लवकर आगमनाने संकटाची चाहूल

उजनी धरणांच्या विशाल जलाशयामध्ये फेब्रुवारीमध्ये देशविदेशातील विविध पक्ष्यांचे आगमन होत असते. पाणथळ जागा वाढू लागल्याने पाणथळ ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे...त्यात प्लेंमिगो दाखल होत आहेत. पुढे पाणी टंचाई होणार यामुळेच हे पक्षी चार पाच महिने अगोदर उजनीवर दाखल होऊ लागल्याचे जाणकरातून बोलले जात आहे.

flamingo-arrival-on-the-ujani-back-wate
उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

By

Published : Dec 3, 2020, 1:43 PM IST

पंढरपूर - हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो किलोमीटरवरून फ्लेमिंगो पक्षी उजनी धरणाच्या बॅकवॉटरजवळ हिवाळा संपत आल्यानंतर पोहचतात. मागील १५ दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील भादलवाडी, कुंभारगाव, डाळज, पळसदेव, भिगवण, खानोटा, कोंढार चिंचोलीच्या बॅकवॉटरला फ्लेमिंगो पक्षांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी उजनी धरणाच्या बॅकवॉटरला पक्षप्रेमींची गर्दी वाढत आहे. परदेशी पाहुणे अर्थात ’फ्लेमिंगो’ (रोहित) पक्ष्यांचे उजनी जलाशयात आगमन झाले असून, या गुलाबी पंक्षांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी होत आहे. ईटीव्ही भारत विशेष..

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

उजनी धरणावर विदेशी पक्ष्यांची गर्दी

थंडीची चाहूल संपतताच जानेवारी-फेब्रुवारी कालावधीत हे पक्षी उजनी जलाशयावर विणीच्या हंगामासाठी दाखल होतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. फ्‍लेमिंगोसोबतच उजनी काठावर राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तूतवार तापस जातींचे पक्षीही दाखल झाल्याने उजनीचा काठ विविधरंगी पंक्षांनी चांगलाच बहरला आहे. पक्षी अभ्यासकांना, पर्यटकांना वेड लावणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयावर झाले आहे. या पक्ष्यांच्या सहवासाने जलाशयाचा परिसर सौंदर्याने फुलून गेला आहे. परिसरात फ्लेमिंगो जलाशयाच्या परिसरात ठिकठिकाणी थव्या थव्याने राहत आहेत. पर्यटक व पक्षी अभ्यासकांची पावलं या परिसरात वळू लागली आहेत. उजनी परिसरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंसह इतर विविध प्रकारचे अनेक पक्षी गर्दी करत असतात.

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

फ्लेमिंगोचा असा असतो जगप्रवास

जगभरात या पक्ष्याच्या एकूण ६ प्रजाती आढळतात. लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो या २ प्रजातींपैकीच भारतातील स्थानिक आहे. ज्या आपल्याकडे दरवर्षी आगस्ट ते सप्टेंबरमध्ये दिसतात. भातखाचरं, लहान-मोठी पाण्याची तळी, गोड्या पाण्याचा तलाव, जलाशय, खाड्या, मोठ्या धरणाचा पाणपसारा, मिठागरे, दलदली ही ठिकाणं या पक्ष्यांची अधिवासाची ठिकाणं आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो, असे निसर्ग अभ्यासक यश मस्करे यांनी सांगितले.

हेही वाचा - मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

जुन्नरजवळील पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात रोहित पक्षी चक्क भर पावसाळ्यात दिसतात. जूनच्या सुरुवातीला ते येथे येतात. सप्टेंबरपर्यंत ते येथेच दिसतात. फॉरेस्ट रेकॉर्डनुसार १९८१ ते १९८२ पासून त्यांची नोंद आहे. कच्छच्या रणातही आढळते. उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे.भारतातपण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात. पाणी व ऊन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते. त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. हिवाळा संपत आल्यावर स्थलांतरीत पक्षाचे माहेरघर असणाऱ्या उजनी धरणावर नेहमी समुद्रात वावर असणाऱ्या या परदेशी पाहुणे लक्षणीय संख्येने दाखल होतात. धरणांच्या पाणलोट परिसरात अनेक पक्षी मोठ्या संख्येने येतात पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले आहे

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

चार महिन्याच्या आधीच विदेशी पक्ष्यांचे आगमन

उजनी धरणांच्या विशाल जलाशयामध्ये फेब्रुवारी मध्ये देशविदेशातील विविध पक्ष्यांचे आगमन होत असते. उजनीची पाणीपातळी घटू लागली आहे. त्यामुळे आता हळूहळू पाणथळ जागा वाढू लागल्याने पाणथळ ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे...त्यात प्लेंमिगो दाखल होत आहे. तर पानकावळे, चित्रबलक, चांदवा, राखीबगळा, मानबगळा, कुरव, पट्टकंदब याबरोबर परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने उजनी पाणवटा फुलून जाऊ लागला आहे. या पक्ष्याच्या हालचालीने उजनी परिसरात विहंगम दृश्य दिसू लागली असली तरी पुढे येणारे संकट स्पष्ट होत आहे. पुढे पाणी टंचाई होणार यामुळेच हे पक्षी चार पाच महिने अगोदर उजनीवर दाखल होऊ लागल्याचे जाणकरातून बोलले जात आहे.

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

हेही वाचा - राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार अतिविशेषोपचार रुग्णालय

अगोदर आगमन हे गडद दुष्काळाची जाणीव......

निसर्गतुन , कमी पर्जन्यमान ,दुष्काळआदी संकटाची चाहुल मानवापेक्षा पक्षाला आधी लागत असते. संकटाची जाणीव वेळोवेळी हवामान विभाग, शासन प्रशासनाकडून मानवाला करुन दिली जाते. येणाऱ्या संकटाची चाहुल लागल्याने पशुपक्षी सावध होतात पण मानव हा जाणिव करुन देखील बेसावध राहत असल्याचे दिसून येते. पण यावर्षी उजनीच्या पाणीसाठ्यावर अनेकांचा डोळा आहेच. त्यामुळे पाण्यासाठी अनेक वेळा संघर्ष होणार, राजकारण होणार हे मात्र नक्की ...उजनीवर आलेल्या या पक्ष्यांच्या आगमनामुळे किमान शासन प्रशासन तरी या दुष्काळी परिस्थितीत जागृत राहील काय ?

उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी,

पक्षी प्रेमींसाठी नंदनवन उजनी धरण..

उजनी धरणातील पाणी उन्हाळ्यात कमी होत असल्याने कीटक, मासे, मृदुकाय प्राणी,बेडकाची पिल्ले आदी खाद्यान्न विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काही पक्षी तर आपल्या वंशवाढीसाठी सुध्दा परदेशातून इकडे वाऱ्या करतात़. विपुल पाणी, मुबलक खाद्यान्न,लपण्यासाठी व विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उजनी परिसरात आहे. विविध जाती, अनेक प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे एकमेव ठीकाण उजनी धरण असल्याने पक्षी प्रेमी, पक्षी अभ्यासकांनी उजनी धरण नंदनवनच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details