पंढरपूर (सोलापूर)- विठ्ठल मंदिराजवळ भिंत कोसळून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव श्लोक रवींद्र घन ( वय ५, रा. तांबेकर गल्ली, पंढरपूर) असे नाव आहे. ही घटना गुरुवारी चारच्या सुमारास घडली आहे. वाढदिवसादिवशी पाच वर्षाच्या चिमुरड्याचा अंगावर भिंत कोसळली. यामुळे श्लोकचा मृत्यूमुळे विठ्ठल मंदिर परिसरातील तांबेकर गल्लीत हळहळ व्यक्त होत आहे.
विठ्ठल मंदिराजवळ भिंत कोसळून चिमुरड्याचा मुत्यू, जन्मदिनीच घडली दुर्दैवी घटना - wall collaps incident pandharpur
भिंत कोसळून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या वाढदिवशीच ही घटना घडल्याने परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
भिंत कोसळून चिमुरड्याचा मुत्यू
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमा होरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे जुन्या वाड्याची भिंती पाडण्याचे काम सुरू होते. भिंतीचा काही भाग वाड्यासमोरून जात असलेल्या श्लोक रवींद्र घन याच्या आंगावर पडली. त्याखाली अडकवून जागीच त्याचा हात तुटून बाजूला पडला. त्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केला.