सोलापूर- पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुनानक चौकात अचानक आगीच भडका उडाला. या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये छोट्या व्यापारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाच बंब पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली.
पाच दुकाने जळून खाक
शनिवारी (दि. 16 जाने.) सकाळी सुरुवातीला गुरुनानक चौकातील एका गादीच्या दुकानाला आग लागली. या आगीत आजूबाजूचे मोबाईल दुकान, फोटो स्टुडिओ, महाइसेवा केंद्र, हॉटेल, असे एकूण पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानांवर झाडांचा पालापाचोळा भरपूर पडला असल्याने देखील आगीचा मोठा पेट घेतला होता.
पाच बंब पाण्याचा फवारा मारून आग विझवण्यात आली