पंढरपूर (सोलापूर)-यंदाच्या ऊस गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 93 हजार 754 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. या गाळपातून तीन लाख 58 हजार 430 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत झालेल्या ऊस गाळपातून जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा हा 7.26 टक्के मिळाला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या कारखानामध्ये भैरवनाथ शुगर युनिट नंबर 3, इंद्रेश्वर शुगर, सिद्धनाथ शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, दि. सासवड माळी शुगर, लोकनेते बाबुराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रिज, कै. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना या कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाला शुभारंभ केल्यापासून ते आतापर्यंत 4 लाख 93 हजार 754 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.