सोलापूर - करमाळा विधानसभा मतदारसंघात गटबाजीच्या राजकारणाला सुरुवात झाली असून, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांसह चार संचालकांनी बागल गटविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी आमदार नारायण पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने बागल गटाला धक्का बसला आहे.
आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा हेही वाचा - 'होय...माझ्याकडेही काळा पैसा आहे'
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, संचालक बापूराव देशमुख, डॉ. हरिदास केवारे, नितीन जगदाळे, या बागल गटाच्या पाच संचालकांनी करमाळा येथे पत्रकार परिषद घेतली. कारखान्यात रश्मी बागल आणि त्याचे भाऊ दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले, ऊस वाहतूक, तोडणी कामगारांची देणी त्याशिवाय कामगारांचा पगार थकवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारखान्यात सुरू असलेल्या मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून आम्ही बागल गटास सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीला अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे करमाळा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात राजू शेट्टींना मोठा धक्का; स्वाभिमानीच्या काटेंसह तिघांचा भाजपप्रवेश