महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur Railway Station : सोलापूर रेल्वे स्थानकात तरूणीचा राडा; फर्स्ट क्लास वेटिंग रुमची तोडफोड - destroyed by Girl at Solapur railway station

सोलापूर रेल्वे स्थानकात ( Solapur Railway Station ) एका तरुणीने मोठा धिंगाणा केला आहे. रेल्वे स्थानकावर असलेलं फर्स्ट क्लास वेटिंग रूम अक्षरशः फोडून काढत चक्काचूर ( first class waiting room was literally smashed to pieces ) केले आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकात तरूणीचा राडा
सोलापूर रेल्वे स्थानकात तरूणीचा राडा

By

Published : Oct 21, 2022, 12:46 PM IST

Updated : Oct 21, 2022, 3:55 PM IST

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकात Solapur Railway Station शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी एका तरुणीने मोठा धिंगाणा केला आहे. लोखंडी अँगल हातात घेऊन सोलापूर रेल्वे स्थानकावर असलेलं फर्स्ट क्लास वेटिंग रूम अक्षरशः फोडून काढत चक्काचूर first class waiting room was literally smashed to pieces केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी ताब्यात घेईपर्यंत माथेफिरू तरुणीने वेटिंग रूमचे सर्व खिडक्या, आतील टेबल खुर्च्या तोडले होते. आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले आहे. लोहमार्ग पोलीस संबंधित तरुणीची विचारपूस करत असून त्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.

सोलापूर रेल्वे स्थानकात तरूणीचा राडा

राडा करणाऱ्या तरुणीची वेशभूषा उच्च : सोलापूर रेल्वे स्थानकावर फर्स्ट क्लास वेटींग रूम फोडून काढणाऱ्या तरूणीला आरपीएफ जवानांनी रोखले. त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती मराठीत उत्तरे देत उद्धट बोलत होती. त्याची बॅग, त्याचे अंगावरील कपडे हे उच्च घरण्यातील वाटत आहे. मराठी भाषेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत ती चवताळून पोलिसांच्या अंगावर धावून जात आहे. ती मनोरुग्ण आहे, का किंवा तिने मानसिक त्रासातून हे कृत्य केले आहे. त्याचा तपास सुरू आहे.लोहमार्ग पोलिसांनी त्याचं नाव व पत्ता याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नाही.

फर्स्ट क्लास वेटिंग रूम फोडून काढल्यानंतर पोलीस दाखल : शुक्रवारी सकाळी फर्स्ट क्लास वेटिंग रूम मध्ये माथेफिरू तरुणीने उच्छाद मांडला होता.जवळपास अर्धा तास तिने सोलापूर रेल्वे स्थानकावर धिंगाणा घातला.फ्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे प्रवाशांनी हे सर्व कृत्य मोबाईल कॅमेरात चित्रीकरण केले.काही वेळाने आरपीएफ जवान दाखल झाले,पण तोपर्यंत त्या माथेफिरू तरुणीने रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान केले होते.

Last Updated : Oct 21, 2022, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details