प्रतिक्रिया देताना नागरीक सोलापूर: गारमेंट कारखान्यातील सर्व कपडे जळून खाक झाले आहेत. सोमवारी सकाळी ही आग लागली होती. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनीसुद्धा शर्थीचे प्रयत्न केले आहे. आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीत आजूबाजूचे कारखाने जळून भस्म झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास गड्डम गारमेंट फॅक्टरीला आग लागली होती. सर्वजण साखर झोपेत असल्याने आगीचा मोठा भडका उडाला.
जीवितहानी नाही, लाखो रुपयांचे नुकसान :आगीचे आगडोंब दिसताच अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. परंतु अग्नीने रौद्ररुप धारण केल्याने आजूबाजूला असलेली चिटमिल कारखाना, लारा कारखाना असे चार कारखाने आगीत भस्म झाले आहेत. शहराच्या मध्यभागी ही कारखाने असल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. अग्नीशामक दलाने सुद्धा ताबडतोब पाणी फवारणीचे बंब पाठवले. अग्नीशामक दल आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
17 जानेवारीची घटना :कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली होती. आगीत ७० वर्षीय आजी आणि २२ वर्षीय नातीचा होरपळून मृत्यू झाला होता. खातीजा हसम माइमकर आणि नात इब्रा रौफ शेख अशी मृतांची नावे होती. ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र थंडीचे दिवस असल्याने घरातील झोपलेल्या कुटुंबाला जाग आली नव्हती. दोन तासाने वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर अचानक घरातील हॉलमध्ये आग लागली होती. त्यावेळी आजी आणि नात या दोघी बेडरुममध्ये झोपल्या होत्या होत्या.
उपचारापूर्वीच मृत्यू :या जळीत कांडातधूर आल्याने नातीच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्या दोघींनी खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हॉलमध्ये भीषण आग लागल्याने दोघींना बाहेर पडता आले नव्हते. त्याचवेळी आगीचा भडका उडाल्याने आणि धुराने दोघी गुदमरल्या होत्या. आगीने काही क्षणात भीषण रूप धरण केले होते. यामध्ये घरातील संसारपयोगी साहित्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. घरात झोपलेल्या ७० वर्षीय महिला आजी व तिची २२ वर्षीय नातीन आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा: Snowfall in Kashmir : श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाच सेंटीमीटर बर्फाची नोंद