सोलापूर - कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान जिल्हाबंदीची अंमलबजावणी सुरू असताना विनापरवाना जिल्ह्याबाहेर गेल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील अंजनडोहचे पोलीस पाटील विलास शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल व पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता ते पुण्याला गेले होते. याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली.
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी तक्रार दिली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व प्रतिनिधींना नेमून दिलेल्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंजनडोह गावात भेट दिल्यानंतर पोलीस पाटील जागेवर नसल्याचे त्यांना कळले.
करमाळ्यात सीमाबंदीचा भंग ; अंजनडोह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल - karmala police
कोरोनामुळे लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदीची अंमलबजावणी सुरू असताना विनापरवाना जिह्याबाहेर गेल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील अंजनडोहचे पोलीस पाटील विलास शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळ्यात सीमाबंदीचा भंग ; अंजनडोह पोलीस पाटलांवर गुन्हा दाखल
त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर पोलीस पाटील पुण्याला गेल्याची माहिती त्यांनी मिळाली. त्यांची मुले पुण्यातील वारजे-माळवाडी येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. यासाठी पाटील पुण्याला गेल्याचे वरिष्ठांना कळले.
याप्रकरणी पोलीस पाटील यांच्याविरोधात आपत्ती कायद्याच्या कलम 51 ब व 56 तसेच भा.दं.वि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे पुढील तपास करत आहेत.