महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्यात १५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडावर कुऱ्हाड; गु्न्हा दाखल - सार्वजनिक बांधकाम विभाग माढा

सचिन भोसले आणि हनुमंत भोसले या दोघा बंधुची कुर्डूवाडी मार्गावरील माढेश्वरी मंगल कार्यालयासमोर जागा आहे. या जागे समोर जवळपास १५० वर्षांपुर्वीचे चिंचेचे वृक्ष आहे. सचिन भोसले, हनुमंत भोसले हे रविवारी सकाळी झाडाजवळ आले असता त्याच्या चार ते पाच मोठ्या फांद्या तोडुन रस्त्यावर टाकल्याचे दृश्य त्यांना पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षापासुन हनुमंत भोसले हे या झाडाला वाहनाद्वारे पाणी आणून घालत होते.

१५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडावर कुऱ्हाड
१५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडावर कुऱ्हाड

By

Published : May 17, 2021, 10:27 AM IST

माढा (सोलापूर) -पर्यावरणाचे संरक्षण करने ही काळाची गरज झाली आहे. मात्र विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी वृक्षांची कत्तल केली जात आहे. माढा शहरात असाच एक वृक्ष तोडीचा प्रकार समोर आला आहे. रस्ते विकासाचे खोटे कारण देऊन एका व्यक्तीने तब्बल १५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत. मात्र, हे प्रकरण फांद्या तोडणाऱ्या तरुणाला महागात पडले आहे. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. गणेश विष्णु भांगे असे झाडाच्या फांद्या तोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर सचिन राजाराम भोसले यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तसेच आता हनुमंत भोसले हे या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार आहेत.

१५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडावर कुऱ्हाड


सचिन भोसले आणि हनुमंत भोसले या दोघा बंधुची कुर्डूवाडी मार्गावरील माढेश्वरी मंगल कार्यालयासमोर जागा आहे. या जागे समोर जवळपास १५० वर्षांपुर्वीचे चिंचेचे वृक्ष आहे. सचिन भोसले, हनुमंत भोसले हे रविवारी सकाळी झाडाजवळ आले असता त्याच्या चार ते पाच मोठ्या फांद्या तोडुन रस्त्यावर टाकल्याचे दृश्य त्यांना पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षापासुन हनुमंत भोसले हे या झाडाला वाहनाद्वारे पाणी आणून घालत होते. हा वृक्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने निघा राखत जोपासला होता. मात्र, रविवारी त्याच्या फांद्या तोडल्याने हनुमंत भोसले यांना क्षणाधार्थ रडू कोसळले.

वृक्ष तोडीविरोधात भोसलेंनी धरला ठिय्या-

या फांद्या तोडण्याबाबत माहिती घेतली असता गणेश भांगे याने हे कृत्यू केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर भोसले यांनी फोन करुन खडसावले देखील. मात्र भांगेने यावली-सालसे राज्य मार्गाच्या अभियंत्याने वृक्ष तोडण्यास सांगितले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने त्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या. यावर संतप्त झालेल्या भोसले यांनी त्या ठिकाणीच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

गुन्हा दाखल, न्यायालयातही घेणार धाव

या प्रकरणी सचिन भोसले यांनी माढा पोलीस ठाण्यात खासगी मालकीच्या जागेतील चिंचेच्या वृक्षाच्या फांद्या तोडल्याची तक्रार दाखल केली. तसेच या घटनेची विचारणा केली असता शिवीगाळ, दमदाटी झाली असल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश भांगे विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी हनुमंत माळी हे न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहेत. सनदी अधिकारी विपुल वाघमारे यांनी माढ्यात इन्स्पायर फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष चळवळ उभी केली आहे. मात्र याच माढ्यात जुन्या वृक्षाच्या फांद्या तोडल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करुन घटनेचा निषेध नोंदवलाय.

बांधकाम विभागाचे आदेश नव्हते-

राज्य मार्गाचे काम जरी असले तरी अनेक वर्षाची जुनी सावली देणारी झाडे जगली पाहिजेत. ती न तोडता काम झाले पाहिजे या दृष्टीनेच मी अनेक झाडे न तोडता तशीच ठेवली आहेत. तसेच या १५० वर्ष जुन्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे आदेश मी दिलेले नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आनंद नाझरे यांनी दिली. तसेच वृक्षाच्या फांद्या तोडण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासनही सार्वजनिक बांधकाम उप विभाग कुर्डूवाडीचे उपविभागीय अभियंता आनंद नाझरे यांनी दिले.



ABOUT THE AUTHOR

...view details