महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकारमंत्र्यांच्या लोकमंगलसह तीन साखर कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल - लोकमंगल साखर कारखाना

उसतोड कामगार आणि ऊसवाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कारखान्यांनी भरण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांने दिले होते. मात्र, सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीनही कारखान्यांनी उसतोड कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही.

सहकारमंत्री सुभाष देशमुख

By

Published : Jul 3, 2019, 9:09 PM IST

सोलापूर -साखर कारखान्यांनी उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखन्यांसह सोलापुरातील तीन साखर कारखान्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नातेवाईकांचे लोकमंगलचे दोन साखर कारखाने आहेत, तर सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापूरातील मोठे प्रस्थ असलेल्या धर्मराज काडादी यांचा आहे.

उसतोड कामगार आणि ऊसवाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कारखान्यांनी भरण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांने दिले होते. मात्र, आदेश देऊनही सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीनही साखर कारखान्यांनी २०१८ ते २०१९ या गाळप हंगामातील उसतोड कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, कार्यकारी संचालक संतोष कुंभार, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, विवेक पवार, पराग पाटील, संजय घोरपडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details