सोलापूर - कोरोनाच्या संकटामुळे गावोगावच्या यात्रा, विविध कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन वारंवार करत आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रशासनाच्या सुचनांचे पालन होताना दिसत नाही. आपत्कालीन परिस्थितीतही जिल्ह्यातील नांदणीत गावदेवी नागम्मादेवीची यात्रा भरवण्यात आली. त्यामुळे गावच्या सरपंचासह, माजी सरपंचासह 17 ग्रामस्थांना मंद्रुप पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाचे आदेश धाब्यावर ठेवत भरवली यात्रा, सरपंचासह 17 जणांवर गुन्हा - नांदणीत १७ जणांवर गुन्हा दाखल
कोरोनामुळे राज्यात यात्रा, उरूसांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असून, तशा सूचना गावोगावच्या ग्रामस्थांना दिल्या आहेत. असं असतानाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणीत ग्रामदेवतेची यात्रा भरवण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी गावच्या सरपंचासह 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनामुळे राज्यात यात्रा, उरूसांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असून, तशा सूचना गावोगावच्या ग्रामस्थांना दिल्या आहेत. असं असतानाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणीत ग्रामदेवतेची यात्रा भरवण्यात आली. त्याला स्थानिक सरपंच कावेरी चिदानंद सुरवसे आणि त्यांचा पती तथा माजी सरपंच चिदानंद सुरवसे याचं पाठबळ होतं. विशेष म्हणजे या यात्रेच्या संदर्भात दवंडी देऊन प्रबोधन करण्यात आले असतानाही ही यात्रा भरवण्यात आली. शिवाय याठिकाणी देवीचा होम करून आगीच्या निखाऱ्यावरून चालतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. आता प्रशासकीय यंत्रणा जागी झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
यात्रेचे आयोजन केल्या संबंधी सरपंच कावेरी सुरवसे, त्यांचे पती आणि पूर्वाश्रमीचे सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह 17 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित यात्रेकरु ग्रामस्थांनी पलायन केले असून, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.