सोलापूर :महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) सुरू असताना मूलभूत सुविधा मिळत नाहीत म्हणत कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून ११ ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आलेला होता. या सर्व ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावून बरखास्तीचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर दहा ग्रामपंचायतींकडून ठराव मागे घेण्यात आले, तर आळगे या एका गावाकडून उत्तर प्रशासनाकडे प्राप्त झाले नव्हते. अखेर, बुधवारी सकाळी आळगी ग्रामपंचायतच्या प्रमुखांनी लेखी उत्तर देत महाराष्ट्र राज्यात राहू असे म्हणणे सादर केले आहे.
Border Dispute : अखेर, त्या 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा आग्रह घेतला मागे - 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा आग्रह
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या ( Maharashtra Karnataka Border Dispute ) पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील काही गाव कर्नाटक सीमेवर असल्याने आम्हाला महाराष्ट्र शासन काहीही मूलभूत सुविधा देत नाही, आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. आज ( 14 डिसेंबर ) अखेर त्या 11 गावाच्या ग्रामपंचायतींनी ठराव मागे घेत कर्नाटकात समाविष्ट होण्याचा आग्रह मागे ( Request withdrawn included in Karnataka ) घेतला आहे.
या गावांनी घेतली माघार : मागील महिनाभरात अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील ११ गावांतील नागरिकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा देत कर्नाटकस सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नोटिसा 11 गावच्या सरपंचांना नोटिसा पाठविल्या होत्या. अक्कलकोट तालुक्यातील व कर्नाटक सिमवेर असलेल्या धारसंघ, आंदेवाडी खुर्द, शावळ, हिळ्ळी, मंगरूळ, देवीकवठे, केगाव बु. आळगे, कल्लकर्जाळ, कोर्सेगाव, शेगाव या 11 गावांना नोटीस देण्यात आली होती.अखेर, या गावांनी कर्नाटकमध्ये जाण्यासाठीचा आग्रह मागे ( Request withdrawn included in Karnataka ) घेतला आहे.
कर्नाटकात जाण्याचा इशारा : महाराष्ट्र सीमेवर असलेल्या कर्नाटक राज्यातील गावांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. सीमेवर असल्याने आम्हाला महाराष्ट्र शासन काहीही मूलभूत सुविधा देत नाही, आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार अक्कलकोट गटविकास अधिकाऱ्यांनी त्या ११ गावांना नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी दहा ग्रामपंचायतींनी ठराव मागे घेत असल्याचे सांगत प्रशासनाकडे सादर केले होते. अक्कलकोट तालुक्यातील आळगे या एका गावाकडून उत्तर आले नव्हते. बुधवारी आळगी गावच्या सरपंच सुगलाबाई महंतेश हतुरे यांनी लेखी उत्तर देत खुलासा सादर करत आम्ही केलेला ठराव मागे घेत असल्याचे लेखी उत्तर दिले आहे.