सोलापूर- जिल्ह्यात ग्रामीण भागातदेखील कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला तालुक्यातील एका गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आज दिवसभरात सोलापूरात 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झालेल्याची संख्या सोलापूर शहरात 49 इतकी झाली आहे, तर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातही 1 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडला आहे.
सांगोला तालुक्यातील एकाला लागण, सोलापुरात कोरोनाचे 50 रुग्ण - सोलापूर कोरोना न्यूज
सांगोला तालुक्यातील एका गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आज दिवसभरात सोलापूरात 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झालेल्याची संख्या सोलापूर शहरात 49 इतकी झाली आहे, तर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातही 1 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडला आहे.
![सांगोला तालुक्यातील एकाला लागण, सोलापुरात कोरोनाचे 50 रुग्ण fifty corona positive found in solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6940834-351-6940834-1587825804390.jpg)
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या यामुळे 50 झाली असून यातील चार जणांचा आधीच मृत्यू झाला आहे, तर 46 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
आज एकूण 9 रुग्ण वाढले यात चार सोलापुरातील शांतीनगर भागातील, तर कुमठा नाका लष्कर येथील प्रत्येकी एक, तर मोदी भागातील दोघा जणांचा समावेश आहे. यातील पाच जण सारी विकार झाल्याने दाखल झाले होते. त्यांच्या चाचण्याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
आतापर्यंत 1129 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यातील 987 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 937 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत, तर अजून 142 जणांचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. आज सांगोल्यात तालुक्यातील ज्या गावात हा रुग्ण मिळून आला तेथील परिसर सील करण्यात येऊन त्याच्याशी संपर्कातील लोकांची माहिती गोळा करणे सुरू आहे.