सोलापूर- सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढताना झालेल्या चुकांमुळे तीन तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीचे पुन्हा आरक्षण काढण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडे मार्गदर्शनपर अहवाल मागवण्यात येणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. यात माढा तालुक्यात 6, करमाळा तालुक्यात 2 तर बार्शी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
माढा व करमाळा तालुक्यातील आरक्षण चुकले
माढा तालुक्यातील परिते, लहू, तांबवे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्रीऐवजी अनुसूचित जाती, असे झाले आले. तर ग्रामपंचायत भोगेवाडी-जाखले, अरण व रिधोरे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती ऐवजी अनुसूचित जाती स्त्री असे काढण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील फिसरे व कुंभेज ग्रामपंचायतीचे आरक्षण चुकले आहे.