महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजी विक्रीसाठी जाणाऱ्या पंधरा शेतकरी रस्त्यावर घसरून जखमी तर एका शेतकऱ्याचा मृत्यू - सोलापूर शहर बातमी

सोलापुरातील शेळगी पुलावर शनिवारी (दि. 13 जून) रात्री रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. पण, ते पूर्ण न झाल्याने दररोज पहाटे मार्केट यार्डला भाजीपला व शेतमाल विक्रीस नेणाऱ्या शेतकऱ्यांना या रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची दुचाकी वाहने घसरली. सुमारे 15 जण जखमी झाले व एका शेतकऱ्याला जड वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

महादेव कदम
महादेव कदम

By

Published : Jun 13, 2021, 9:16 PM IST

Updated : Jun 13, 2021, 10:15 PM IST

सोलापूर- येथील शेळगी पुलावर रात्री रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. बाजार समितीत आपला भाजीपाला विकण्यास जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची दुचाकी वाहने रस्त्याचा अंदाज न आल्याने घसरली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. महादेव बाळासाहेब कदम (वय 34 वर्षे, रा. गूळवंची, ता. उत्तर सोलापूर), असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर 15 शेतकरी जखमी झाले आहेत. महामार्गाचे काम पाहणारे अधिकारी व ठेकेदार यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संताप व्यक्त करताना ग्रामस्थ

पंधरा शेतकरी जखमी आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू

गूळवंची, हिप्परगा, उळे आदी गावातील शेतकरी दररोज शेळगी येथील महामार्गवरून सोलापूर बाजार समितीत भाजी व शेतमाल विक्रीसाठी जातात. पण, शनिवारी (दि. 12 जून) दिवसभरात शेळगी पुलावर मशीनच्या साहायाने महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. ही बाब शेतकऱ्यांना माहित नव्हती. रोजच्या प्रमाणे रविवारी (दि. 13 जून) पहाटे शेतकरी हे दुचाकीवरून मार्केट यार्डकडे दुचाकीवर जात होते. रविवारी पहाटे सुमारे 15 शेतकरी याठिकाणी दुचाकीवरून घसरून जखमी झाले आहेत. तर महादेव कदम हे दुचाकीवरून खाली पडले. त्यावेळी मागून आलेल्या जड वाहनाने धडक दिली. याचा महादेवचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी महादेव याला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ठेकेदारावर व महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या अपघातामध्ये दिगंबर पाटील, जयसिंह भोसले, नवनाथ जाधव ,हनुमंत जगताप, ऋत्विक नवगिरे, बाळकृष्ण ठोंबरे, लखन इंगळे, प्रदीप भोसले आदी शेतकरी जखमी झाले आहेत. याबाबत गूळवंची गावंचे सरपंच विष्णू भोसले यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -सोलापूर विद्यापीठाने बनविला विशेष सुरक्षा मास्क; केंद्र सरकारच्या नियातकालिकेत प्रसिद्ध

Last Updated : Jun 13, 2021, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details