पंढरपूर - भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यात पिता-पुत्र जागीच ठार झाले आहेत. अनिल मच्छिंद्र गावडे व धनाजी अनिल गावडे अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास मोहोळ-विजापूर महामार्गावर मोहोळ शहराजवळ घडली.
कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार - fatrher and son dies
भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने पिता-पुत्र जागीच ठार झाले आहेत. अनिल मच्छिंद्र गावडे व धनाजी अनिल गावडे अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत.
शेजबाभूळगावकडे दुचाकीवरून जात असताना अनिल गावडे आणि धनाजी हे मोहोळ - विजापूर महामार्गावर हॉटेल कोवेरीजवळ आले. त्यावेळी कुरुलहून मोहोळच्या दिशेने राँग साईडनेभरधाव वेगात आलेल्या कंटरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. गावडे पिता-पुत्र जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहोळ शहरातील उड्डाण पुलाजवळ पोलिसांनी त्याला पकडले. मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.