करमाळा (सोलापूर) - कोरोनाच्या भीतीने संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होत आहे. करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने या शेतकऱ्याचे कलिंगड पीक बाजारात न गेल्यामुळे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्याचे कलिंगड पिकाचे बारा लाखाचे नुकसान - करमाळा सोलापूर
देशात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होत आहे. करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने या शेतकऱ्याचे कलिंगड पीक बाजारात न गेल्यामुळे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिकांचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने या शेतकऱ्याने 4 एकर शेतात 'शुगर किंग' या जातीच्या कलिंगड पिकाची लागवड केली होती. यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आला. यापासून साधारण 12 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते.
हे पीक घेण्यासाठी त्यांनी लोकांकडून हात ऊसने पैसे घेतले असून ते त्यांना परत कसे करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. माझ्यासारखे महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून एकरी दीड ते दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.