महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे माढा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

वडशिंगे ते कदमवस्ती या रस्त्याव काही शेतकऱ्यांनी काटेरी झाडे टाकत अतिक्रमण करुन रस्ता अडवला आहे. यामुळे रस्त्यापलीकडे असलेल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी माढा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

agitator
agitator

By

Published : Aug 8, 2020, 3:48 PM IST

माढा (सोलापूर) - वडशिंगे ते कदमवस्ती, रणदिवेवाडी जुना सापटणे (भोसे) रस्त्यावर काटेरी झाडे टाकत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवत रस्ता वापरण्यास मोकळा करावा, या मागणीसाठी काही शेतकरी माढा तसहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. ही उपोषण गुरुवारपासून (6 ऑगस्ट) सुरू आहे.

भारत पालकर, महादेव शिंदे, शहाजी कदम, दत्तात्रय कदम, स्वामिनाथ कदम या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्याबाबत घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधत उपोषणास सुरुवात केली.
रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी सार्वजनीक रस्त्यावर अतिक्रमण केला आहे. त्यामुळे वडशिंगे व रणदिवेवाडी गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाणे कठीण झाले आहे.

हा रस्ता एखादी सायकल जाईल एवढाच वाहतुकीसाठी वापरता येतो. यामुळे काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून रस्ता मोकळा करत मुरूम टाकून वापरण्यायोग्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रस्तावरील झाडे काढण्यासाठी गेले असता अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

सार्वजनिक रस्ता सर्व शेतकऱ्यांना वहिवाटास मोकळा करुन द्यावा, अशी मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाबरोबर वडशिंगे ग्रामपंचायतीचा ठराव, वडशिंगे गावचा नकाशा जोडून देण्यात आला आहे.

अन्यथा आत्मदहन करू
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यात अतिक्रमण आहे. यामुळे येणे-जाणे कठीण झाले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवत हा रस्त्या मोकळा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे. जर 15 ऑगस्टपर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही तर आम्ही आत्मदहन करु, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details