सोलापूर : घाईगडबडीत जाणाऱ्या विखे पाटलांनी निवेदन न स्वीकारल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना वेळीच ताब्यात घेत, गोंधळ थांबवला. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूलमंत्री आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सोलापूर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, अशी प्रमुख मागणी शेतकरी करत होते. बंदोबस्तासाठी उपलब्ध असलेल्या पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने महसूलमंत्री विखे पाटील हे सुखरूप बाहेर पडले.
निवेदन न स्वीकारल्याने पालकमंत्र्यासमोर घोषणाबाजी : पालकमंत्री विखे पाटीलसोलापूर जिल्ह्यातुन चेन्नई सुरत महामार्ग जात होते. त्यामुळे अनेक शेतकरी हे राधाकृष्ण विखे पाटील यांसोबत नियोजन भवन येथे शनिवारी चर्चा करण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर महसूलमंत्री बाहेर येताच जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्याचा प्रयत्न यावेळी शेतकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील यांनी गडबडीत निवेदन न स्वीकारताच निघून गेले. पोलिसांनी देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.