सोलापूर शहरालगत असलेल्या तिर्हे ते पाकणी व तिर्हे ते शिवणी या दरम्यान रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. बांधकाम खात्याच्या रस्ते विकास कार्यालयाला येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने देण्यात आली होती.पण आजतागायत येथील ग्रामस्थांच्या समस्या सुटल्या नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांनीन व ग्रामस्थांनी बुधवारी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रहार जनहित शेतकरी संघटनेमार्फत सोलापूर शहरातील Prahar Janhit Farmers Association Solapur सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयात येऊन घोषणा दिल्या आणि मुख्य कार्यालयाच्या नामफलकावर शाई फेक करून काळे Villagers Blackened The PWD Building In Solapur फासले. बांधकाम खात्याने याची दखल घेतली नाही तर ,अधिकाऱ्यांना देखील काळे फासू ,शाई फेक करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांनी बांधकाम भवनाला काळे फासले
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे ते पाकणी व तिर्हे ते शिवणी या दरम्यान रस्स्त्याची अनेक दिवसांपासून समस्या आहे.ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खोदकाम करणात आले आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा तसेच शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सोलापूर शहरात ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मदतीला धावून प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकर्यांनी बांधकाम भवनात येऊन धिंगाणा केला. अधिकाऱ्यांचा निषेध केला. मुख्य कार्यालयाच्या नाम फलकाला काळे फासले.