सोलापूर -पुरेसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन केले. निरेच्या पाण्यासाठी तिसंगी येथे आमरण उपोषण सुरू आहे तर सोनके गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंढरपुरात नीरेचा पाणी प्रश्न पेटला, पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण - ठिकठिकाणी आंदोलने सुरू
पुरेसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन केले.
सध्या नीरा कालव्यातून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी पंढरपुरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. तिसंगी, सोनके तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी तिसंगी येथील शेतकऱ्यांनी कालव्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर याच मागणीसाठी सोनके येथील शेतकऱ्यांनी पंढरपूर- कराड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. २ तास आंदोलन सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता अमोल निकम यांनी तलावात 50 क्युसेक्सने पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.