पंढरपूर (सोलापूर) - बँक ऑफ महाराष्ट्रने शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी वंचित ठेवले. तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासही बँक टाळाटाळ करत आहे. बँकेतील अधिकाऱ्यांना जाग यावी म्हणून विविध शेतकरी संघटनेकडून पंढरपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यासंदर्भात बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पंढरपुरात कर्ज मिळत नसल्याने शेतकरी संघटनेचे बँकेसमोर आंदोलन
राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. मात्र, बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पंढरपुरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर बोंबाबोंब आंदोलन केले.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, पंढरपूर तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार शाखा आहेत. या चारही शाखेत शेतकऱ्यांना कर्ज देताना टाळाटाळ करण्यात आले, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध होईल व नव्या दमाने पुन्हा बँकेत जावून पेरणीसाठी कर्ज देतील या आशेने शेतकरी कर्ज मागण्यासाठी बँकेत जातात. मात्र, बँक अधिकारी शेतकऱ्यांना अरेरावी आणि दमदाटी करत आहे. तरी अशा बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
बळीराजा शेतकरी संघटना आणि जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी पूर्ण न झाल्यास बँक व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हलणवर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.