महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; सोलापुरातील घटना - कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

करमाळा तालुक्यातील कव्हे येथील अमोल भारत ताकमोगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतातील पाईपलाईनचे कर्ज फेडण्याची चिंता असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेला शेतकरी

By

Published : Aug 31, 2019, 12:58 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील कव्हे येथील अमोल भारत ताकमोगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. भारतने लऊळ गावात जाऊन विष घेतले. शेतातील पाईपलाईनचे कर्ज फेडण्याची चिंता असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुलगे, मुलगी, पत्नी व एक बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा चंद्रपुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

शेतात कांदे लावण्यासाठी रोपे आणतो, असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अमोल भारत ताकमोगे (वय-39) या शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. अमोलने लऊळ (तालुका माढा) येथील संत कुर्मदास मंदिर शिवारात भिमा सिना जोड कालव्याच्या बोगद्यावरुन शेतामध्ये केलेल्या पाईपलाईनच्या कर्जाला कंटाळून हे कृत्य केल्याचे चुलत भाऊ सुभाष दिगंबर ताकमोगे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा यवतमाळध्ये कर्जबजारी तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

लऊळ तालुका माढा येथील पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांना कुर्मदास मंदिर परिसरात माळरानावर मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी एमएच 45 एच 3305 क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी व किटकनाशकांच्या बाटल्या आढळून आल्या. या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या नाल्यावरील झाडामागे फुगलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा महापुरात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; राधानगरीतील घटना

हवालदार धनाजी माळी हे संबंधित घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details