महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वृक्ष संवर्धन; कुटुंबातील १० व्यक्तीच्या नावे लावली २० झाडे, घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ

रोपळे खुर्द या गावातील संताजी पाटील यांनी कुटूंबातील १० व्यक्तींच्या नावे २० वृक्षांची लागवड करत वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली आहे. उपळाई ते रोपळे पाटील वस्ती रोड लगत दोन्ही बाजुनी ही वृक्षलागवड करण्यात आली आहे.

Solapur
शेतकऱ्याने लावलेली झाडे

By

Published : Jun 7, 2020, 5:16 AM IST

सोलापूर- माढा तालुक्यातील रोपळे खुर्द या गावातील संताजी पाटील यांनी कुटूंबातील १० व्यक्तींच्या नावे २० वृक्षांची लागवड करत वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली आहे. उपळाई ते रोपळे पाटील वस्ती रोड लगत दोन्ही बाजुनी ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. संताजी पाटील यांच्या कुटुंबात १० व्यक्ती आहेत. कुटूंब सदस्यांनी एकत्रित बसून वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.

कुटूंबातील प्रत्येक सदस्याने २ वृक्षांची लागवड करत त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आहे. चिंच, जांभूळ, आंबा, करंजी या वृक्षांची लागवड केली. केवळ वृक्ष लागवड करुनच न थांबता प्रत्येक सदस्यांने झाडास शेडनेट कुंपन करून घेतले आहे. दररोज झाडांना पाणी मिळावे यासाठी ठिंबक सिंचनची प्रत्येक झाडाला सोय केली आहे. पाटील परिवाराने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उचललेले हा पाऊल निश्चितच प्रेरणादायी अन् आशादायी असेच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details