महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ना वीज, ना मोटार.. तरिही शेतीला बोअरवेलमधून 24 तास पाणी; पाहा उमरड येथील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग - Saipan method for watering farm

दादा पवार यांच्याजवळ सात ते आठ एकर शेती आहे. या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी दोन बोअरवेल आणि एक विहीर खोदली होती. मात्र, पाण्याअभावी त्यांना थोडीच शेती बागायती करता येत आहे. बोअरवलचा सबमर्सिबल पंप (मोटार) सातत्याने खराब होत असल्याने त्यांच्यापुढे अनेकदा अडचण निर्माण होत असे.

Karmala Solapur Agriculture news
करमाळ्यातील शेतकऱ्याचा वीजबचतीसाठी अभिनव प्रयोग

By

Published : Jun 1, 2020, 4:35 PM IST

करमाळा (सोलापूर) - बोअरवेलमधील पाणी कोणताही पंप न बसवता आणि कोणत्याही प्रकारच्या विजेचा वापर न करता, शेतीला दिले जात आहे; असे जर कोणी आपल्याला सांगितले तर आपला त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकरी, दादा पवार यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. पाहुया ईटीव्ही भारतने यावर बनवलेला एक खास रिपोर्ट.

करमाळ्यातील शेतकऱ्याचा वीजबचतीसाठी अभिनव प्रयोग... सायपन पध्दतीने शेतीला पाणी

उमरड येथील दादा पवार यांचे शिक्षण जेमतेम सातवी पास इतकेच झालेले आहे. कुटुंबात त्यांच्यासह आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असे इतर पाच मंडळी आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असून पवार यांच्याजवळ सात ते आठ एकर शेती आहे. या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी दोन बोअरवेल आणि एक विहीर खोदली होती. मात्र, पाण्याअभावी त्यांना थोडीच शेती बागायती करता येत आहे. बोअरवलचा सबमर्सिबल पंप (मोटार) सातत्याने खराब होत असल्याने त्यांच्यापुढे अनेकदा अडचण निर्माण होत असे. त्यावर दादा पवार यांनीच एक अनोखा पर्याय शोधून काढला.

हेही वाचा...शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

सायपन पध्दतीचा केला वापर...

दादा पवार यांनी सातत्याने मोटार जळण्यावर उपाय म्हणून सायपन पध्दतीने बोअरवेलचे पाणी विहिरीत सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विहिरीतील साठलेले पाणी ठिबकद्वारे ऊसाला देण्याचा विचार केला. त्यादृष्टीने त्यांनी बोअरवेल आणि विहिरमधील अंतर मोजून एक पाईप आणला. त्या पाईपमध्ये पाणी भरून तो बोअरवेलमधून विहिरीत सोडला. त्यानंतर पाईपमधून विहिरीत पाणी येण्यास सुरूवात झाली. विहिर आणि बोअरवेल यांच्यातील अंतर सुमारे 400 फूट अंतर असून त्यामुळे बा प्रयोग यशस्वी झाला आहे. गेल्या एक महिन्यापुर्वी केलेल्या प्रयोगामुळे आजतागायत 24 तास पाणी सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details