पंढरपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. विठ्ठल मंदिर सुरू होत असल्यामुळे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राज्यातील इतर मंदिरांपेक्षा विठ्ठल मंदिर पूर्णतः वेगळे आहे. विठ्ठल मंदिराला पदस्पर्श व मुखदर्शनाची परंपरा आहे. मात्र, सोमवारी सुरू होणाऱ्या विठ्ठल दर्शनाबाबत पदस्पर्श दर्शन व मुखदर्शन चालू होणार हा प्रश्न महाराज मंडळी उपस्थित करत आहे.
विठ्ठल मंदिर प्रशासन सज्ज
पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. मार्चपासून बंद असलेले मंदिर आता खुले होणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. मंदिर खुले करताना कोरोना महामारी रोखण्यासाठीही मंदिर प्रशासनही सज्ज झाले आहे. मंदिर प्रशासनाची रविवारी याबाबत बैठक होणार आहे. त्यामध्ये दर्शन मंडप, सभा मंडप यांची देखरेख काम मंदिर समितीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. तसेच मंदिर उघडल्यानंतर भाविकांना कोणत्या प्रकारे सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापर, वारकरी व भक्तांना मंदिर समितीकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीला याबाबत कोणताही अहवाल राज्य सरकारकडून मिळाला नसल्यामुळे विठ्ठल दर्शन पदस्पर्श मुखदर्शन होणाऱ्या बाबतीत अजूनही शंका आहे.
विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत