सोलापूर -जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने जोर धरला आहे, त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक जून पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील अंतर्गत 199 रस्त्यांपैकी तब्बल 173 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 1 जूनपर्यंत हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
हेही वाचा -विठ्ठल मंदिर समितीकडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप
जिल्ह्यामध्ये एक जून पर्यंत संचारबंदी
राज्य सरकारने एक जून पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी सोलापूर जिल्ह्यातही असणार आहे. मात्र, यामध्ये फक्त किराणा व भाजीपाला विक्रीला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, खरेदीच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढू शकतो, या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.