महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विठ्ठल मंदिरात जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक, कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई - विठ्ठल मंदिर

आषाढी यात्रेतील अष्टमीच्या दिवशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या पुलावर काही भाविकांनी समितीच्या कर्मचाऱ्याकडे देणगी दिली, त्याबद्दलची पावतीही त्यांना देण्यात आली. नंतर पुढे गेल्यावर दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वेगळ्या स्वरुपाची पावती असल्याचे भाविकांच्या लक्षात आले, त्यांनी ह्याबाबत मंदिर समितीला कळवले.

विठ्ठल मंदिर

By

Published : Jul 16, 2019, 11:37 AM IST

सोलापूर - पंढरीत आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जुने पावती पुस्तक वापरून एका कर्मचाऱ्याने भाविकांची व समितीची फसवणूक करून पैशाचा अपहार केला. या प्रकरणी संबंधित हंगामी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांनी दिली आहे. सिद्धेश्वर घायाळ असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.


आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत लाखो भाविक येतात. विठ्ठलावरील श्रद्धेपोटी भाविक देणगी व अन्य स्वरूपात विठ्ठलाला दान देतात. यामुळे देणगी स्विकारण्यासाठी मंदिर व दर्शन मंडप परिसरात केंद्रे उभारली आहेत. देणगी स्विकारण्याचे काम मंदिर समिती स्वयंसेवक व हंगामी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. देणगी स्विकारण्यासाठी त्यांच्याकडे पावती पुस्तकेही दिली आहेत.

जुने पावती पुस्तक वापरुन वारकऱ्यांची फसवणूक करणारा निलंबित


आषाढी यात्रेतील अष्टमीच्या दिवशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या पुलावर काही भाविकांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याकडे देणगी दिली. सिद्धेश्वर घायाळ यांनी संबंधित भाविकांना पावत्याही दिल्या. भाविक पुढे गेल्यावर त्यांना दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे देणगीची पावती वेगळ्या स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आले. पावत्यांमध्ये विसंगती पाहून संबंधित भाविकांना देणगी स्विकारण्यात काहीतरी घोळ असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात धाव घेतली.


सर्वांच्या सूचनेनुसार मंदिर समितीतील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून भाविकांनी संशय व्यक्त केलेल्या कर्मचाऱ्यायाला शोधून काढले. मंदिर समितीने अनेक वर्षापूर्वी बरखास्त केलेले पावती पुस्तक या कर्मचाऱ्याकडे आढळून आले. यामुळे तत्काळ त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details