महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2020, 9:47 PM IST

ETV Bharat / state

मंगळवेढा आगाराच्या वाहकाला कोरोना.. वेळेत उपचार न मिळाल्याने मुंबईत मृत्यू

मुंबई येथील बेस्टच्या सेवेत असलेले सोलापूर विभागातील मंगळवेढा आगाराचे वाहक भगवान गावडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. बेस्ट सेवेमध्ये असणारे सोलापूर जिल्ह्यातले तब्बल 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Corona update news
वेळेत उपचार न मिळाल्याने वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर -मुंबई येथील बेस्टच्या सेवेत असलेले सोलापूर विभागातील मंगळवेढा आगाराचे वाहक भगवान गावडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. बेस्ट सेवेमध्ये असणारे सोलापूर जिल्ह्यातले तब्बल 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गावडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव यांनी गावडेंना उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने गावडे यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांना मूळव्याधीचा देखील त्रास असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबईच्या रस्त्यांवरील प्रवाशांची कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमामध्ये एसटीच्या एक हजार गाड्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये सोलापूर विभागातील ४८ कर्मचारी मुंबईत बेस्ट उपक्रमात २६ ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवेढा डेपोच्या भगवान गावडे यांचा देखील समावेश होता. गावडे यांना वेळेव उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गावडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान बेस्ट उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे जेवण देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. याबाबत वारंवार तक्रारकरून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details