सोलापूरMaratha Hunger Strike : मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी अंकोली गावातील भैरवनाथ नरहरी भोसले व विष्णू अण्णा पवार हे गेली दोन दिवस झाले आमरण उपोषणाला बसले आहेत. विष्णू अण्णा पवार यांच हे वय 85 वर्षे आहे हे एका पायाने अपंग आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही हा निर्धार त्यांनी केला आहे. रविवारी सकाळी वृद्ध विष्णू पवार यांची डॉक्टराच्या टीमने तपासणी केली असता, त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झालं असल्याचा अहवाल दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्यास डॉक्टरने सांगितलं असता त्यांनी औषध उपचार घेणार नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे.
सोलापुरातील मराठा समाज आक्रमक : सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या मुख्य ठिकाणी ग्रामपंचायती समोर मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोनशे गावात राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना, मंत्र्याना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दहन करून आरक्षणाची मागणी केली आहे. तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे.