महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Signature Campaign : राज्याच्या राजकारणावर सोलापुरात मनसेची एक सही संतापाची - मनसेची एक सही संतापाची

मनसेच्या वतीने शनिवारी सकाळपासून राज्यातील राजकारणावर एक सही संतापाची हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापूर शहरातील मुख्य चौकात मनसेच्या नेत्यांनी हा उपक्रम हाती घेत, नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

Solapur News
सोलापुरात मनसेची एक सही संतापाची

By

Published : Jul 8, 2023, 6:25 PM IST

माहिती देताना प्रशांत गिड्डे

सोलापूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात एक सही संतापाची हा उपक्रम राबवला जात आहे. राज्यातील राजकारणावर सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त करत, एक सही संतापाची या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आहे. सोलापुरातील अनेक नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. मतदानावेळी मत दिलेला फायदा काय? हे राजकारणी सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षासोबत जाऊन सत्तेत सहभागी होत आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांकडून मतदानाला तिलांजली देण्यात येत आहे, असा संताप सोलापूरकरांनी व्यक्त केला आहे.

सोलापुरातील मुख्य चौकात एक सही संतापाची : सोलापूर शहरात असलेल्या पार्कचौक या ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एक सही संतापाची हा उपक्रम राबवला आहे. तसेच नागरिकांचे मत जाणून घेतले. एक सही संतापाची फलक लावून सह्यांची मोहीम हाती घेतली. सोलापूर शहरातील नागरिकांनी या मोहिमेला भरघोस प्रतिसाद दिला आहे.



सोशल मीडियावरवर देखील संताप : एक सही संतापाची या फलकाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी शनिवारी सकाळपासून नागरिकांची सोलापुरातील मुख्य चौकात गर्दी झाली होती. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याच्या मार्गावर होती. मनसेच्या पदाधिकऱ्यांनी दिवसभर फलकासमोर थांबून एक सही संतापाची याचा प्रचार केला.

जनतेचा भ्रम निरास झाला आहे : मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी राज्याच्या राजकारणावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर एक सही संतापाची सही मोहीम अभियान हाती घेतले आहे. राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. जनतेला अनेक वचने देत, मते प्राप्त केली. त्या मतांना तिलांजली देत सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी हातमिळवणी करत आहेत. सध्याच्या गढूळ राजकारणाची परिस्थिती पाहता, राज्यात राज ठाकरेंशिवाय पर्याय उरला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : दौऱ्याची सुरुवात करण्यास नाशिकच का निवडले, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
  2. Maharashtra Political Crisis : नाराज आमदारांमुळे डोकेदुखी वाढली; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रात्री खलबते
  3. NCP Political Crisis: शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ रॅलीने देणार उत्तर, नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

ABOUT THE AUTHOR

...view details