सोलापूर-जिल्ह्यात शुक्रवारी 86 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यापैकी शहरात 49 तर ग्रामीण भागात 37 रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर शहरात 3075 रुग्ण तर ग्रामीण भागात एकूण रुग्ण संख्या 710 झाली आहे. शहर व ग्रामीण असे मिळून कोरोना रुग्णांची संख्या 3785 झाली आहे.
सोलापुरात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर देखील जास्तच आहे. शुक्रवारी शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 2 रुग्ण दगावले आहेत. सोलापूर शहरात कोरोनाने झालेल्या मृत्यूची संख्या 296 वर पोहोचली आहे. ग्रामीण सोलापूरमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 328 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामधून 49 पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामध्ये 28 पुरुष व 21 महिला आहेत. 91व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
ग्रामीण सोलापूरमध्ये वाढलेल्या 37 रुग्णांमध्ये 28 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शुक्रवारी 6 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन वेगवेगळे पर्याय शोधत आहे. पण ही वाढ काही थांबत नाही. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन देखील लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.