पंढरपूर (सोलापूर)- पंढरपूर शहरात सध्या कोरोना संसर्गाची साथ झापट्याने वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज (गुरुवार) 8 कोरोना रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. सध्या पंढरपुरात 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. टाळया व हरी नामाच्या गजरात त्यांना घरी सोडण्यात आले.
मागील पंधरा दिवसांमध्ये पंढरपुरात कोरोनाचा फैलाव जास्त झाला आहे. यापूर्वी आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आज आणखी आठ जणांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बुधवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून रेडझोनमधून आलेल्या नागरिकांमुळे तालुक्यात कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन विभागाने तालुक्यातील परस्थिती समन्वयाने हाताळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे येथील स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.