सोलापूर- एबीसी मुस्लिम संघटना व अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात यांच्यावतीने मोहंम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगोला येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती होती.
पैगंबर मोहंम्मद यांनी संपूर्ण जगाला समता, बंधुता आणि अहिंसेचा संदेश दिला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संगोला येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लहानमुलांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन सांगोला व अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी आमदार गणपतराव देशमुख, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार, गटनेते सचिन लोखंडे, नगरसेवक सुरेश माळी, गजानन भाकरे, अस्मिर तांबोळी, संजय देशमुख, नगरसेविका, बापुसो ठोकळे, पत्रकार निसार तांबोळी, साजिद तांबोळी, आसिफ इनामदार, मुन्ना बागवान, नईम तांबोळी, मुन्ना बागवान, शहाजान बागवान, वसीम तांबोळी, शहनशा मुलानी यासह अनेक समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. मोहंम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगोला शहरातून शोभयात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सांगोला शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. सदरचा कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा-कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या संगमेश्वरच्या 60 भाविकांना विषबाधा