महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात मोबाइलविनाही शिक्षण, कामगारांच्या मुलांसाठी उभारलीय शैक्षणिक भिंत - सोलापूर शैक्षणिक भिंत न्यूज

विडी कामगारांची मुलं...घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची...दोन वेळचं पोटाला अन्न मिळेल याची शाश्वती नाही...मग, ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल अन् लॅपटॉप कुठून येणार? मोबाईलचं सोडाच...पण, त्यांना ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय? तेच माहिती नाही...या कोरोनाच्या काळात शाळा तर बंदच...मग शिकायचं कसं? असा प्रश्न निर्माण झालाय...पण, त्यावर उपाय शोधून काढलाय तो एका अवलियानं...

solapur latest news  online education in corona time  corona effect on education  सोलापूर लेटेस्ट न्यूज  सोलापूर ऑनलाइन शिक्षण  सोलापूर शैक्षणिक भिंत न्यूज  शिक्षणावर कोरोनाचा परिणाम
सोलापुरात मोबाइलविनाही शिक्षण, कामगारांच्या मुलांसाठी उभारलीय शैक्षणिक भिंत

By

Published : Sep 7, 2020, 8:10 AM IST

सोलापूर -शहरातील निलम नगर परिसरात विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार राहतात. घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे सरकारनं सुरू केलेले ऑनलाइन शिक्षण घेणार तरी कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. पण, याच परिसरातील शिक्षकाने भिंती रंगवून या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देणं सुरू केलंय.

विडी कामगारांच्या मुलांना दोन वेळ पोटाला अन्न मिळेल याची शाश्वती नसते. त्यांना ऑनालाइन शिक्षण ही संकल्पनाच माहिती नाही. लॅपटॉप तर सोडाच साधा मोबाईलही ते विकत घेऊ शकत नाही. त्यांची मुलं याच परिसरात असलेल्या आशा मराठी विद्यालयात शिकायचे. पण, कोरोना आला अन् शाळाच बंद पडली. त्यानंतर सरकारनं ऑनलाइन शिक्षण द्यायचे ठरवले. पण, जिथे दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सुटत नाही तिथे मोबाईल कुठून घेणार? मोबाईल नसेल तर ऑनलाइन शिक्षण घेणंही शक्य नाही. पण, त्यावर आशा मराठी विद्यालयातील शिक्षक राम गायकवाड यांनी शक्कल लढवली. त्यांनी पेंटच्या सहाय्यानं शैक्षणिक भिंत उभी केली. त्यावर बाराखडी, इंग्रजीचे व्याकरण, गणिताची सूत्रे, सुविचार, विज्ञानाचे प्रयोग, असा सर्व अभ्यासक्रम रेखाटला आहे. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून अभ्याक्रमाचे नियोजन केल्याच्या सूचना दिल्या आहे. मुलंही हसत-खेळत अभ्यासामध्ये रमली आहेत. राम गायकवाड यांनी अभ्यासाचा फॉर्म्युला विद्यार्थ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवला आणि कामगारांची मुलं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शिक्षकांसह शाळेचे आभार मानले.

चिरकाळ टिकणारी शैक्षणिक भिंत -
जाहिरातीच्या जोरावर मोबाईल किंवा स्मार्टफोन आणि लॅपटॉप बाजारात विकले जात आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये या गोष्टींना महत्व आले आहे. पण आज देखील अनेक शाळांमध्ये चार भिंतीच्या आत फळा आहेच. फळ्यावरच विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या फळ्यावरील मजकूर पुसता येतो आणि मोबाईल व लॅपटॉपमधील डेटा डीलीट करता येतो. पण पेंट केलेल्या भिंतीवरील मजकूर खूप दिवस टिकणार आहे. वादळ, वारा, पाऊस यापासून या शैक्षणिक भिंतींना धोका नाही. चिरकाळ टीकणाऱ्या शैक्षणिक भिंती आहेत.

कामगारांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दिलासा -
ऑनलाईन शिक्षण तर घेता येत नाही, तर ऑफलाइन कसे घायचे असा प्रश्न पडला असताना, राम गायकवाड या शिक्षकाच्या मदतीने ऑफलाइन शिक्षण भिंतीवर सुरू झाले आहे. त्यामुळे टेक्सटाईल कामगारांच्या किंवा विडी कामगार महिलांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बाईट

ABOUT THE AUTHOR

...view details