महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ranjitsinh Disale: डीसले गुरुजी पुन्हा अडचणीत! चौकशी सुरू असताना राजीनामा देता येत नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

स्वत:चा ४०० पानांचा खुलासा देऊन ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला. पण, दोन्ही चौकशी समित्यांच्या कचाट्यात अडकलेल्या ग्लोबल टीचरचा राजीनामा मंजूर होणे अशक्य आहे. ( Resignation of Ranjitsinh Disale ) दरम्यान, चौकशी सुरू असताना राजीनामा किंवा राजीनामापूर्व नोटीस देखील देता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रणजीत सिंह डिसले
रणजीत सिंह डिसले

By

Published : Aug 5, 2022, 7:42 PM IST

सोलापूर - चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर स्वत:चा ४०० पानांचा खुलासा देऊन ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला. पण, दोन्ही चौकशी समित्यांच्या कचाट्यात अडकलेल्या ग्लोबल टीचरचा राजीनामा मंजूर होणे अशक्य आहे. ( Resignation of Ranjitsinh Disale rejected ) राजीनामा मागे घेण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत होती पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी (5 ऑगस्ट) रोजी राजीनामा मंजूर करत असल्याचे पत्र झेडपी सीईओ आणि डीसले गुरुजींना पाठवले. चौकशी सुरू असताना राजीनामा किंवा राजीनामापूर्व नोटीस देखील देता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशी सुरू असताना डीसले गुरुजींनी राजीनामा दिला -जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्युआर कोड’ शिक्षणप्रणाली देणाऱ्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्रथमीक शाळेवरील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एका वर्षानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. पण, जवळपास ३४ महिन्यांत ते एकदाच त्याठिकाणी गेल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याने आणि काही अधिकाऱ्यांकडून जाणिवपूर्वक त्रास होत असल्यावरून त्यांनी थेट नोकरीचा राजीनामाच दिला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील आवाहन केले -ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर देशभर प्रसिध्द झालेल्या डिसलेंनी राजीनामा देऊ नये, म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी त्यांना राजीनामा न देण्याचे आवाहन करण्यात आले. संजय राठोड आणि किरण लोहार या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समित्यांनी डीसले गुरुजींच्या चुकीवर बोट ठेवले आहे. त्यामुळे ग्लोबल टीचर कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत.

पोस्टाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले -जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहिती देताना सांगितले की, डीसले गुरुजींना राजीनामा नामंजूर करत असल्याचे पत्र माढा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांना पाठवले आहे. त्यांनी ते पत्र रणजितसिंह डीसले यांना दिला आहे. प्रशासकीय कारणे समोर करत राजीनामा नामंजूर करत असल्याची माहिती दिली. प्रशासकीय कारणात अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, चौकशी सुरू असताना राजीनामा देता येत नाही. किंवा राजीनामा पूर्व नोटीस देखील देता येत नाही. चौकशी समितीच्या निर्णयानंतर राजीनामा किंवा राजीनामापूर्व नोटीस देता येते.

हेही वाचा -Kedar Dighe : केदार दिघेंच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांचे 'त्या' प्रकरणी समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details