सोलापूर - शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळांचा उत्साह शिगेला पोहचलेला असताना, युवाशक्तीच्या ऐक्यासाठी नावलौकिक असलेल्या थोरला मंगळवेढा तालमीच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती 2020 च्या निमित्ताने एक नवा आदर्श निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. मंडळाने शिवजयंतीनिमित्त खर्च होणाऱ्या पैशातून दहा हजार शिवप्रेमींसह पोलिसांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
ना डॉल्बी..ना डिजिटल...दोन घास प्रेमाचे; 'या' मंडळाची अनोखी शिवजयंती हेही वाचा- टिकटॉकवरील 'स्कल ब्रेकर चॅलेंज' ठरतेय धोकादायक, सांगलीत विद्यार्थी जखमी
दरवर्षी भव्य शिवजयंती साजरी करणाऱ्या थोरला मंगळवेढा तालीम मंडळाने गेल्या वर्षीपासून डॉल्बी आणि चौका-चौकामध्ये लावण्यात येणाऱ्या डिजिटल डेकोरेशनवर होणाऱ्या खर्चाला फाटा दिला आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण आणि खर्चही कमी झाला. शिल्लक राहिलेल्या पैशांतून गावाकडून शहरात शिवजयंतीच्यानिमित्ताने येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आणि बंदोबस्तावर तैनात पोलिसांना प्रेमाचे दोन घास भरवले. त्यामुळे या मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा -सगळंच माफ करायला लागलो तर कपडेच काढून जावं लागेल...