महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर; अपंग, अजारी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी ई रिक्षा दाखल - पंढरपूर विठ्ठल मंदिर लेटेस्ट न्यूज

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज पंढरपूरमध्ये येतात. मात्र, त्यामध्ये काही विकलांग, अपंग तसेच आजारी व्यक्ती असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये सोडले जाते. कारण त्यापुढे जाण्यास वाहनांना बंदी आहे. त्यामुळे अपंग किंवा विकलांग भाविकांना छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर असा त्रासदायक प्रवास करावा लागतो.

अपंग, अजारी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी ई रिक्षा दाखल
अपंग, अजारी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी ई रिक्षा दाखल

By

Published : Feb 19, 2021, 6:27 PM IST

पंढरपूर-श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या अपंग, विकलांग व आजारी भाविकांसाठी दोन ई रिक्षा मंदिर समितीला देण्यात आल्या आहेत. मंदिर समितीच्या सदस्य ऍड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन व वेणु सोपान वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने या ई रिक्षा देगणीस्वरुपात देण्यात आल्या आहेत. या ई रिक्षाची किंमत दहा लाख रुपये आहे. 21 फेब्रुवारी रोजी ई-रिक्षा सेवेमध्ये दाखल होणार आहेत.

अपंग, अजारी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी ई रिक्षा दाखल

अपंग विकलांग भाविकांना ई-रिक्षाचा लाभ
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज पंढरपूरमध्ये येतात. मात्र, त्यामध्ये काही विकलांग, अपंग तसेच आजारी व्यक्ती असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये सोडले जाते. कारण त्यापुढे जाण्यास वाहनांना बंदी आहे. त्यामुळे अपंग किंवा विकलांग भाविकांना छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर असा त्रासदायक प्रवास करावा लागतो. तो टाळण्यासाठी माधवी निगडे यांच्या पुढाकारामुळे अपंग, विकलांग व आजारी भाविकांचा त्रास कमी व्हावा यासाठी या ई रिक्षा देण्यात आल्या आहेत. यामुळे अपंग व विकलांग भाविकांना पांडूरंगाचे दर्शन घेणे सोईस्कर होणार आहे.

प्रदूषण विरहित ई रिक्षा
दोन्ही ई-रिक्षा बॅटरीवर चालणार असल्याने त्या चालवण्यासाठी इंधनाचा खर्च करावा लागणार नाही. फेरारी गाडीप्रमाणे या रिक्षांना गिअर बॉक्‍स आहेत. मंदिर समितीला भेट देण्यात आलेल्या दोन्ही रिक्षांच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी देखील माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावर असणार आहे. एका गाडीत ८ भाविकांना बसण्याची व्यवस्था आहेत. या गाड्या चौफाळा गेट ते मंदिर, महाद्वार पोलीस चौकी ते मंदिर या मार्गावरूनच धावणार आहेत. याचा लोकार्पण सोहळा २१ फेब्रुवारीला होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details