सोलापूर - येथील सांगोली तालुक्यातील बागेवाडी येथे बनावट विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
सोलापूरमध्ये बनावट विदेशी दारूसाठा जप्त - duplicate foreign liquor seized Solapur
सांगोला तालुक्यातील बागेवाडी शिवारात बनावट विदेशी दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
सोलापूरमध्ये बनावट विदेशी दारूसाठा जप्त
सांगोला तालुक्यातील बागेवाडी शिवारात बनावट विदेशी दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर भरारी पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी बनावट दारू तयार करून त्याची विक्री केली जात होती. जवळपास अडीच लाख रूपयाची बनावट दारू जप्त करण्यात आली. यामध्ये देविदास कांबळे, मोहन कदम, धनाजी कदम, यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी