पंढरपूर - सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किमीचे अंतर पार करून विठ्ठलभक्त पंढरीत येतो. पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो, मात्र सध्या चंद्रभागा नदीपात्र यावर्षी वारकऱ्यांविना कोरडे पडले आहे.
पांडुरंग हे संकट नक्की दूर करेल, या विश्वासाने प्रशासनास सहकार्य म्हणून भाविकांनी पंढरीची वाट यावेळी वर्ज्य करत आपल्या घरी राहूनच एकादशी सोहळा भक्तीच्या माध्यमातून पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल मंदिर परिसर आणि चंद्रभागेचे वाळवंट असे निर्मनुष्य झाले आहे. ज्या चंद्रभागेत लाखो वैष्णवाची गर्दी असते ती चंद्रभागा सुनीसुनी झाली आहे. तिथे फक्त पोलीस त्या चंद्रभागेत दिसून येत आहे. नदी पात्रातील 10 घाटावर वारकऱ्यांची गर्दी होत होती. ते घाट ओसाड पडल्याचे चित्र आषाढीच्या वारीला दिसत आहे.