सोलापूर - फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर एकच रांग ठेवण्यात आल्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टटॅगचा वाहनचालकांना मन:स्ताप हेही वाचा -यावले-सालसे राज्य मार्गाच्या कामाला माढ्यात ब्रेक, पुनर्वसन करण्याची टपरीधारकांची मागणी
टोल नाक्यावर वाहनांना टोल भरण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून सरकारने फास्टटॅग ही प्रणाली विकसीत केली. पण पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर या प्रणालीचा त्रास वाहन चालकांना होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहने एकमेकांना घासल्याने वाद होत असून वाहतूक पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
हेही वाचा -लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी
टोल नाक्यावर टोल देण्यासाठी फास्टटॅगची सक्ती करण्यात आली आहे. रविवारपासून फास्टटॅग नसलेल्या वाहनांसाठी फक्त एकच रांग ठेवण्यात आलेली आहे. ज्या वाहनांना फास्टटॅग आहेत त्यांचे फास्टटॅग देखील व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वरवडे येथील टोल नाक्यावर तीन किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा -भावाला लागली सैन्यात नोकरी, सैनिक भावाने 90 किलोमीटर धावत फेडला नवस
वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. फास्टटॅगच्या सक्तीमुळे सोलापूर-पूणे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून तीन किलोमीटर पेक्षाही जास्त रांग लागल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.