सोलापूरDrug Seized In Solapur:नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूरमध्ये उघडकीस आणलेल्या एमडी अंमली पदार्थ कारखान्या प्रकरणी दहावा संशयित वैजनाथ हळवे या आरोपीला अटक केली आहे. अटक झाल्यानंतर वैजनाथ हळवे (drug smuggler arrested) याकडून मिळालेल्या माहितीनुसार एमडी अंमली पदार्थ बनविण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू-क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड दोन हजार लिटर केमिकल जप्त (Drug chemical stock seized from Solapur) करण्यात आले आहे. ड्रग्ज रॅकेट मधील फरार असलेल्या दोन संशयितांचा मुंबई पोलीस, नाशिक पोलीस कसोटीने तपास करत आहेत.
दोन हजार लिटर केमिकल साठा जप्त:सोलापूरमधील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे केलेल्या चौकशीत सोलापूरमधील वैजनाथ सुरेश हळवे (रा. मोहोळ, सोलापूर) याचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली. नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी वैजनाथ हळवे याला याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. नाशिक पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, सोलापूरमध्ये नाशिक अंमली विरोधी पथकाने ज्या ठिकाणी एमडी बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला. तेथूनच काही अंतरावर एका कारखान्यातून एमडी अंमली पदार्थ बनवण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू- क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड दोन हजार लिटर केमिकल शुक्रवारी जप्त केले.