सोलापूर -माढा तालुक्यातीलदहिवली येथे ओढ्यात वाहून गेलेली चारचाकी अखेर गुरुवारी दुपारी सापडली आहे. मात्र या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे.
ओढ्यात वाहून गेलेली चारचाकी मृतदेहासह सापडली...पाहा पुराची विदारकता शिवाजी भगवानराव यादव (वय 38) असे मृत चालकाचे नाव आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. सीट बेल्ट लावले असल्याने चालकाला कार मधून बाहेर पडता आले नाही,अशी प्राथमिक माहिती समोर येत आहेत.
मंगळवारी रात्री पासून सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र थैमान घातले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच सलग अठरा तास पाऊस पडला. यामुळे नद्या, नाले, ओढे यांना महापूर आला होता. यामुळेच अनेक वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही.
निमगाव ते दहिवली (ता.माढा जी सोलापूर) या मार्गावर बुधवारी (14 ऑक्टो) रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी ओढ्यावरील पुलावरून येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने कार प्रवाहात वाहून गेली. यामध्ये चालकासह तिघेजण होते. चालकाने सीट बेल्ट लावल्याने त्याला बाहेर पडला आले नाही. तो गाडीतच अडकला. अन्य दोन्ही प्रवाश्यांनी उडी मारून जीव वाचवला.
गुरुवारी दुपारी पावसाच्या सरी कमी झाल्याने ओढ्यातील पाण्याची पातळी ओसरली. यांतर ओढ्यात बुडालेली चारचाकी ग्रामस्थांच्या नजरेस पडली. त्यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने ही चारचाकी बाहेर काढली. त्यात चालक शिवाजी यादव हा मृत अवस्थेत होता. या दुर्घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्यासोबत असलेल्या अन्य दोन प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.