महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक रिंगणात - डॉ. जाधव

महाराष्ट्र विधान परिषद पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. प्रा. सुभाष जाधव यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी संघर्षशील पुरोगामी प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे असे सांगितले. शिक्षकांचा सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन, शिक्षक भरती, विनाअनुदानित धोरण कायम रद्द करून शाळांना शंभर टक्के अनुदान अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

DR. SUBHASH JADHAV ON ELECTION
सोलापूर डॉ. प्रा. सुभाष जाधव यांची पत्रकार परिषद

By

Published : Nov 20, 2020, 9:49 AM IST

सोलापूर -पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी संघर्षशील पुरोगामी प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे डॉ. सुभाष आत्माराम जाधव यांनी जाहिर केले. जाधव या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी दत्तनगर लालबावटा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षकांचा सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन, शिक्षक भरती, विनाअनुदानित धोरण कायम रद्द करून शाळांना शंभर टक्के अनुदान अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार आडम मास्तर, सिटूचे राज्य सचिव एम.एच.शेख, अनिल वासम, दत्ता चव्हाण यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर डॉ. प्रा. सुभाष जाधव यांची पत्रकार परिषद

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू
शिक्षकांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभा आहे. शिक्षकांनी निवडून दिल्यास शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असे जाधव म्हणाले. पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे तर शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक डॉ. सुभाष जाधव यांना विजयी करा असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी केले.

हेही वाचा -लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना
शिक्षक आमदारपद शोभेचे, मिरवण्याचे पद नाही
आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षक आमदार शिक्षकांचे व शैक्षणिक व्यवस्थेचे प्रश्न विधानपरिषदेत अभ्यासूपणे व सडेतोडपणे मांडणारा आणि रस्त्यावरील शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व करणारा पाहिजे. त्यात तन-मन-धनाने सहभाग होणारा असला पाहिजे. शिक्षक आमदार पद शोभेचे व मिरवण्याचे व वैयक्तिक लाभ मिळविण्याचे नसून ते जबाबदारीची व बांधिलकीचे समजून काम करण्याचे पद आहे. निवडणूक लढवणे हा देखील चळवळीतच भाग आहे. विधान परिषदेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा -पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details