सोलापूर - सोलापूर येथील डॉ. ईशा अभय वैद्य हिची मिस इंडिया स्पर्धेत निवड झाली आहे. यामुळे सोलापूरचे नाव देशपातळीवर झळकले आहे.जयपूर येथे झालेल्या 26 जणांच्या स्पर्धेच्या फेरीत डॉ. ईशा वैद्यने पहिला टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे दुसरा टप्पा संपन्न होणार आहे. सोलापुरातील जेष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांचे पुतणे डॉ अभय वैद्य यांची कन्या म्हणजे डॉ ईशा वैद्य होय. ईशा या दंतरोग चिकित्सक आहेत. सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयातुन त्यांनी दंतरोग चिकित्सक पदवी प्राप्त केली आहे.
स्वयंअध्ययनावर डॉ. ईशा यांची झेप
डॉ. ईशा वैद्य यांच्या घरातील सर्व जण डॉक्टर व्यवसायात गुंतलेले आहेत.डॉ. ईशा यांनी मागील काही महिन्यापासून सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला.सातत्याने विविध सौंदर्य स्पर्धांत सहभाग नोंदविला.योग्य आहार, व्यायामासोबत या प्रकारच्या स्पर्धांसाठी सामान्य ज्ञान व वैचारिक अभ्यासाची जोड देण्याचे काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे.कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमीवर नसताना डॉ. ईशा वैद्य यांनी स्वयंअध्ययनाच्या जोरावर काम सुरू ठेवले.